शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकांच्या गावात रंगली कवितांची सुरेल गाणी भिलार काव्यमय : ‘कवितेचं गाणं होतांना’ला प्रेक्षकांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 23:49 IST

भिलार : पुस्तकांच्या गावात आज विविध साहित्यिक उपक्रमांच्या मालिकेतील पुढील पुष्प गुंफले गेले.

भिलार : पुस्तकांच्या गावात आज विविध साहित्यिक उपक्रमांच्या मालिकेतील पुढील पुष्प गुंफले गेले. वाचक-पर्यटकांसाठी आज पुस्तकांच्या गावातील श्री जननीमाता मंदिर सभागृहात सुप्रसिद्ध गायक व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या ‘कवितेचं गाणं होतांना..!' या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. घनगर्द निसर्ग आणि नीरव शांततेचा परिसर अशा अनुपम वातावरणात, रसिकांच्या उदंड प्रतिसादासह मैफलीला उत्तरोत्तर रंग चढत गेला.या मैफलीत संत कवींपासून ते आधुनिक कवींच्या कवितांबाबत सलील कुलकर्णी यांनी रसिकांशी संवाद साधला. कवितेचं गाण्यात होणारं रुपांतर आणि कवितांच्या आशय, याबाबतच्या सुंदर सरास्वादाचा अनुभव मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांनी घेतला. मुलाखतकार अस्मिता पांडे यांनी सलील कुलकर्णी यांना बोलतं केलं, तसेच आदित्य आठल्ये (तबला) व रितेश ओहोळ (गिटार) यांनी अनुरुप साथसंगत केली.बेंगळुरू, मुंबई, पुणे, नवी मुंबई, वसई, सातारा, सांगली, कºहाड, कोल्हापूर, पंढरपूर, वाई, महाबळेश्वर, पाचगणी अशा महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून या कार्यक्रमास रसिक (पूर्वनोंदणी करून) उपस्थित होते. राज्य शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे योजण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने भिलार गावातील वळणावळणांवर बा. भ. बोरकर, शांता शेळके, विंदा करंदीकर, स्वा. सावरकर, ग्रेस, सुधीर मोघे आदी सुप्रसिद्ध कवींच्या कवितांसह संत तुकाराम व संत नामदेव यांच्या अभंगांचे आकर्षक फलक लावण्यात आले होते. या फलकांमुळे गावातील वातावरण अधिक काव्यमय झाले होते.

कविता हा साहित्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. मराठी साहित्यात कवितांचे अढळ स्थान आहे. कवितांना सुंदर चाली लावल्यानंतर त्या वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. याचाच आधार घेऊन डॉ. सलील कुलकर्णी यांनी ‘कवितेचं गाणं होतांना...!’ अशी अभ्यासपूर्ण वेबसिरीज निर्माण केली. या मालिकेची समारोपाची मैफील पुस्तकांच्या गावी झाली. या कार्यक्रमाला रसिकांनी अभूतपूर्व हजेरी लावली. पुस्तकांच्या गावात नियमितपणे होत असलेल्या विविध साहित्यिक उपक्रमांबाबत उपस्थित रसिकांनी खूप समाधान व्यक्त केले. या गाण्यांच्या मैफलीला भिलार परिसरातील रसीक नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.पुस्तकांचे गाव म्हणून ओळख झालेल्या भिलार मध्ये डॉ. सलिल कुलकर्णी यांच्या गाण्याचा कार्यक्रम झाला.

टॅग्स :musicसंगीतSatara areaसातारा परिसर